जिल्ह्यात आज १६९ रूग्ण आढळले !

0

जळगावात सर्वाधिक ५७ रूग्ण : आज ११ रूग्णांचा मृत्यू

जळगाव:जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज नव्याने १६९ रूग्ण आढळुन आले असुन जळगाव तालुक्यात सर्वाधिक ५७ जणांचा समावेश आहे. दरम्यान कोरोनामुळे आज ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येने चार हजाराचा टप्पा ओलांडला असुन आत्तापर्यंत एकुण ४१७६ रूग्ण आढळुन आले आहे. आज नव्याने १६९ रूग्णांची त्यात भर पडली आहे. यात जळगाव शहर ५७, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ ९, अमळनेर १८, चोपडा ४, पाचोरा १, भडगाव ३, धरणगाव ३, यावल ८, एरंडोल १४, जामनेर १४, रावेर ५, पारोळा २, चाळीसगाव २, मुक्ताईनगर १ आणि बोदवड येथे १६ रूग्ण आढळुन आले आहेत.

११ रूग्णांचा मृत्यू
कोरोनामुळे आज दिवसभरात ११ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील ४, जळगाव तालुक्यातील १, भुसावळ तालुका १, अमळनेर तालुका १, भडगाव तालुका १, पाचोरा तालुका १, जामनेर तालुक्यातील २ रूग्णांचा समावेश आहे.

Copy