Private Advt

जिल्ह्यातील 200 विद्युत कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी

अधिकारी, कर्मचार्‍यांसह परिवाराने घेतला लाभ

 

नंदुरबार। येथील स्मित हॉस्पिटल, विद्युत महावितरण कंपनी मर्यादित आणि रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत महावितरणच्या जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरीचे पूजनाने झाली. शिबिरात महावितरणच्या सुमारे 200 कर्मचारी तसेच त्यांच्या परिवाराच्या सदस्यांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

महावितरणचे अधिक्षक अभियंता संजय पाटील, कार्यकारी अभियंता खासने, सहा. अभियंता अक्षय मुने, शाखा अभियंता ए.टी.पाटील, श्रीमती राळेगावकर, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष मनोज गायकवाड, सचिव अनिल शर्मा आदी उपस्थित होते. शिबिरात स्मित हॉस्पिटलच्या माध्यमातून मेडिसिन विभाग, जनरल सर्जरी विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, गायनॅस्टीक विभाग, दंतचिकित्सा विभाग, आणि ऑफथेलमिक विभाग यांच्या माध्यमातून विद्युत वितरण कंपनीचे सुमारे 200 कर्मचारी तसेच त्यांच्या परिवाराच्या सदस्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरातून कोणत्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत, याबाबत सविस्तर डॉ.विजय पाटील यांनी माहिती दिली. यशस्वीतेसाठी स्मित परिवारातील डॉ.रोहित पटेल, डॉ.कल्पेश चौधरी, निलेश तवर, शब्बीर मेमन, भरत पटेल, रोटरी परिवारातील इसराइल सय्यद, फकरोद्दीन जलगुनवाला आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ.गौरव तांबोळी, सूत्रसंचालन किरण दाभाडे तर डॉ.अविनाश पाटील यांनी आभार मानले.