जिल्ह्यातील २६६ शाळांवर बसणार सोलर पॅनल !

0

शाळांमध्ये लखलखाट होणार: निविदा मागविल्या जाणार

जळगाव : जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये वीज जोडणी नाही. काही शाळांचे वीज पुरवठा बिले थकल्याने महावितरणने बंद केला आहे. शाळांना घरगुती वापराप्रमाणे बिल न येता व्यावसायिक दराने बिल येत असल्याने ते भरणे शक्य होत नसल्याने शाळांमध्ये सोलर पॅनल बसवण्यात येणार असुन त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २६६ शाळांची निवड याकरिता करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हेलपमेंट एजन्सी (मेडा) तर्फे निविदा प्रक्रीया राबविली जाणार आहे.

पारेशन संलग्न सौर विद्युत प्रकल्प महाराष्ट्र एनर्जी डेव्हेलपमेंट एजन्सीअंतर्गत डीपीडीसीच्या निधीतुन शाळांवर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे.यासाठी सव्वा दोन कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे. सोलर पॅनल बसविल्या नंतर शाळांमध्ये ही विज वापरली जाणार असुन उर्वरीत वीज ही महावितरणला दिली जाणार आहे. यातुन जि.पच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. शाळांवर सोलर पॅनल बसविल्यानंतर ब्रीडींग व नेट मिटर बसविले जाणार आहे.यातुन शाळांमध्ये वापरली जाणारी विज याची मोजणी करून उर्वरीत निर्मीत होणारी वीज ही जिल्हा परिषद महावितरणला विक्री करणार आहे.यासाठी सर्व प्रक्रीया मेढा अंतर्गत पुर्ण केली जात आहे. सोलर पॅनल बसविण्यासाठी शाळांची निवड करण्यात आली असुन त्यात मुक्ताईनगर तालुक्यातुन २४ ,भुसावळ ७,एरंडोल १४,यावल १७,चाळीसगाव ३२,रावेर १६,धरणगाव १५,जळगाव १२,भडगाव १०,चोपडा २६,जामनेर ३७,पाचोरा २४,बोदवड ९,पारोळा १३,अमळनेर १० अशा २६६ शाळांची निवड करण्यात आली आहे.

Copy