जिल्ह्यातील लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी घेतला पदभार

0

जळगाव : 25 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 11 नगरपालिकातील नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपुष्ठात असल्याने  26 रोजी 11 लोकनियुक्त नगराध्यक्षांनी झालेल्या विशेष सभेत नगराध्यक्षपदाचा पदभार अधिकृतरित्या स्विकारला. पारोळा, एरंडोल, चाळीसगाव, सावदा व फैजपूरमध्ये भाजपाच्या नगराध्यक्षांसाठी मिरवणूक काढण्यात आली. धरणगाव, पाचोरा व यावल येथील शिवसेना नगराध्यक्षांनी भगवे फेटे परिधान करून पदभार स्विकारला तर अमळनेर व चोपडामधील शविआ तर रावेर मधील जनक्रांतीच्या नगराध्यक्षांनी आपापाला पदभार स्विकारला. अमळनेर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लोकनियुक्त नगराध्यक्षा पदी पुष्पलता साहेबराव पाटील यांनी पदभार घेतला, चोपडा नगरपरिषेदेच्या आवारात नगराध्यक्षा मनिषा चौधरी यांचा पदग्रहण सोहळा घेतला, धरणगाव येथील नगरपालिका नगराध्यक्षपदी तिसरे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा बहुमान शिवसेनेचे सलिम पटेल यांनी मिळाला, चाळीसगाव येथे भाजपाच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण यांनी पदभार घेतला, रावेर येथे सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी पदभार घेतला, एरंडोल नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी मावळत्या नगराध्यक्षा लक्ष्मीबाई महाजन यांचेकडून दुपारी नगराध्यक्ष दालनात आपला पदभार स्विकारला.

शाश्‍वत विकास हाच कायमचा विकास – अरूणभाई गुजराथी
चोपडा । शहरात अनेक प्रश्न आहेत व काम करण्यासाठी जागा आहे. विकास असा हे तो कधी संपत नाही. त्याला विकास म्हणतात असे महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी नगरपरिषेदेच्या आवारात नगराध्यक्षा मनिषा चौधरी यांचा पदग्रहण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. कार्यक्रमाचा आधी नगरसेवक जिवन चौधरी व नगराध्यक्षा मनिक्षा चौधरी यांनी नगरपरिषदेत श्री गणरायाची पुजा केली. अरूणभाई गुजराथी पुढे म्हणाले शहराचा विकासासाठी तिन काम आपल्याला हाती घ्यावे लागेल एक भुमीगत गटारी, दुसरे चोपडा शहर हगणदारी मुक्त करण्याच व तिसरे पाण्याचे प्रत्येक भागात पाणी गेलं पाहीजे पाण्याचं नियोजन महत्वाचं आहे उन्हाळ्यात पाणी टंचाईचं संकट आता पासून दिसत आहे. 2018 च्या उन्हाळा मध्ये पाण्याचा त्रास रहाणार नाही 70 कोटीची योजना आहे ति योजना आठ महिन्यात पुर्ण झाली पाहिजे असे धोरण शासनाचे आहे हे काम चागल्या पध्दतीने झाले पाहीजे क्वालिटीबाज झाले पाहीजे अस काम आपल्याला करायंच आहे. काम करत असतांना विरोधी पक्षाला लक्षात घेतल पाहीजे. संघर्ष संपला आता समन्वयाने काम करायंचे सर्व संहमतीने नगरपरिषद चालवायची चौवीस तास सात दिवस काम करायचे असही यावेळी सांगितले. कार्यक्रर्माचे प्रास्ताविक चद्रहासभाई गुजराथी यांनी केले. तर प्रभारी मुख्याधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, घनःशाम अग्रवाल, अ‍ॅड. संदीप पाटील, जिवन चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

माजी नगराध्यक्ष मनिषा चव्हाण यांचा कडून मनिषा चौधरी यांनी पदभार स्वीकारला व नगराध्यक्षा मनिषा चौधरी, नगरसेवक जिवन चौधरीसह सर्व नगरसेवकांनी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन चालऊ यासंदर्भाची सामुहीक शपथ घेतली चोपडा नगरपरीषदेच्या इतिहासात पहिल्यांदा पदग्रहन सोहळा व शपथग्रहनाचा कार्यक्रम नगरपरिषदेचा आवारात मंडप टाकुन झाल्याची चर्चा होती. या कार्यक्रमाला माजी चोसाका चेअरमन अ‍ॅड. घनशाम पाटील, कृउबा सभापती जगन्नाथ पाटील, चोसाका चेअरमन निता पाटील, माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराथी, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, डॉ. विकास हरताळकर ,प्रविणभाई गुजराथी, सुरेश पाटील, सुनिल जैन, डॉ. सुरेश बोरोले, आशिष गुजराथी, राजेंद्र पाटील, माजी न्यायधिश गोरख बाविस्कर, अजगरअली सैय्यद अली, उद्योगपती नितीन चौधरी, विकास महाले यांचासह व्यासपीठावर सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल पाटील यांनी तर आभार गणेश पाठक यांनी मानले पदग्रहण सोहळ्याला विविध क्षेत्रातील पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमळनेरात सर्वपक्षियांच्या उपस्थितीत झाला पदग्रहण सोहळा

अमळनेर । अमळनेरकरानी नगर परिषदेच्या निवडणुकीत खरा पुरुषार्थ दाखविला आणि अमळनेर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लोकनियुक्त नगराध्यक्षा पदी पुष्पलता साहेबराव पाटील याना व सुमारे 24 नगरसेवकाना बहुमताने निवडून दिले सत्तेची गुर्मी व नशा जास्त दिवस टिकत नसल्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. सतीश पाटील यांनी न.पा. प्रांगणात आयोजित नगराध्यक्षा पदग्रहण सोहळ्या प्रसंगी सांगितले. नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आणि जिल्ह्याची बैठक घेतली त्यावेळी अमळनेर च्या कार्यकर्त्यांनी सांगितले की सर्व पक्षीय आघाडी करून सत्तेचा गर्व व नशा जिरवायची आहे म्हणून आम्हाला साथ दया आणि सर्वजन एकत्र आले आणि सत्ता मिळवली एकत्र आले आणि खरी ताकद दाखवली आणि सर्व महाराष्ट्राला दाखवून दिले.अमळनेरला बाहेरची कोणीही येत आणि निवडून देतात यात विशेषतः साहेबराव पाटील नाहीत कारण पारोला तालुक्यातील 40 गावे इकडे आहेत.अमळनेर तालुक्याला काहीतरी शाप आहे.तालुक्या सह शहराची धुरा परक्या माणसाकडे देतात. आता निवडणूक संपली असून हेवेदावे व विरोध बाजूला ठेवून शहराचा विकास करा त्यासाठी माझी ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी उभा राहिल आपली सत्ता असो वा नसो सत्यासाठी पुढे राहील असे अश्वासन दिले. सुरवातीला संत सखाराम महाराज गादी पुरुष प.पू.प्रसाद महाराज, ईश्वरदास महाराज, हभप रूपचंद महाराज, मौलाना हाजी इसुब हसरत, या सर्व धर्म गुरूंचे स्वागत नवनिर्वाचित नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी सपत्नीक सत्कार केला. शहरात पाणी पुरवठा सुरळीत ठेवा व सर्व मतभेद विसरून शहराचा विकास करावा तर आ.शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी गटनेते प्रवीण पाठक यांनी सांगितले कि, शहराच्या विकासासाठी व नावीन्यपूर्ण योजनासाठी आम्ही सर्व आघाडीचे नगरसेवक सोबत राहु असे अश्वासन दिले. त्यानंतर मावळत्या नगराध्यक्षा भारती चौधरी यांनी नूतन नगराध्यक्षा पुष्प लता साहेबराव पाटील यांच्याकडे पदभार सोपविला. यावेळी व्यासपिठावर आघाडीचे प्रणेते अनिल भाईदास पाटील, अ‍ॅड. ललिता पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, दलीत नेते रामभाऊ संदानशिव, बिपिन पाटील, गोकुळ बोरसे, महेश कोठावदे, जितेंद्र जैन, हेमंत पवार, शिरीष पाटील, मोनाली पाटील, तिलोत्तमा पाटील, सुलोचना वाघ, संजय पाटील, महेश पाटील, नूतन सर्व नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीचे गट नेते प्रवीण पाठक, नरेंद्र चौधरी, सलीम टोपी व नगरसेवक, नगरसेविका यांनी नूतन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचा सत्कार केला. शिवसेनेतर्फे गटनेत्या संगीता संजय पाटील, नितिन निले, प्रताप शिंपी आदिंनी सत्कार केला, तर अपक्ष नगरसेवक संतोष पाटील, शितल यादव यांनी देखील सत्कार केला. यावेळी माजी कुलगुरु प्रा. शिवाजीराव पाटील, अर्बन बँक चेअरमन शांताराम ठाकुर, शेखा हाजी मिस्तरी श्याम अहिरे आदिंचा सत्कार करण्यात आला. नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी नूतन नगराध्यक्षा भारती पाटील, सर्व नूतन नगरसेवक, अमळनेर शहर विकास आघाडीचे नेते यांचा देखील सत्कार त्यांनी केला. नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांनी आपल्या भाषनात सांगितले की प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा पदाचा बहुमान दिला त्याबद्दल आभार व आघाडीचे प्रनेते व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या सततच्या जनसेवेच्या विकासाच्या प्रयत्नाना सत्तेच्या माध्यमातून दिशा बदलली, दिशा बदलावयासाठी माझ्यासह सदस्य सहकार्याना आपल्या सर्वांच्या कृपेची जोड असू द्यावी.असे सांगितले. यावेळी जयवंतराव मंसाराम पाटील, नामदेवराव पाटील, आहीराणी साहित्यिक पुरस्कार प्राप्त कृष्णा पाटील, जि प सदस्या मीना पाटील, माधुरी पाटील, योजना पाटील, रीता बाविस्कर, योजना पाटील, संदीप पाटील, राजू फापोरेकर, विजय प्रभाकर पाटील, एल.टी.पाटील, हीरालाल पाटील, राष्ट्रवादी माजी ता.अध्यक्ष शिवाजी पाटील, प्रा.सुरेश पाटील, सचिन पाटील, विक्रांत पाटील, रवि पाटील, मुख्तार खाटिक, भागवत पाटील, संजय पाटील यांच्यासह शहरातील विविध संघटनाचे पदाधिकारी, व्यापारी,विविध समाजाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय पाटील यांनी केले तर आभार न.पा. प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी मानले.

धरणगाव नगरपालिका नगराध्यक्षपदी सलीम पटेल
धरणगाव । येथील नगरपालिका नगराध्यक्षपदी तिसरे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा बहुमान शिवसेनेचे सलिम पटेल यांना मिळाला या पदग्रहण समारंभाला सहकार राज्य मंत्री ना. गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, माजी नगराध्यक्ष अजयशेठ पगारिया, माजी नगराध्यक्ष सौ. उषाताई वाघ, नगर परिषद मुख्याधिकारी सपना वसावा, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेना गटनेता विनय भावे, भाजपा चे गटनेते कैलास माळी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी ना. गुलाबराव पाटील सहकार राज्यमंत्री यांनी धरणगांव शहरवासीयांनी शिवसेनेवर जो विश्वास दाखविला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शहरात विकासाची गंगा येणार व शहराचा मुलभूत सुखसुविधांसाठी कुठल्याही प्रकारचा निधी अपूर्ण पडणार नाही याची ग्वाही देवून शिवसेना राजकारण करत नसून समाजकारण करत असते असे उद्गार काढले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, जनतेने मला भरभरून आशिर्वाद दिला असून दाखविलेला विश्वासाला तळा जावू देणार नाही. तसेच जलशुध्दीकरण केंद्राचे काम नगरपरिषद नवीन इमारत रस्ते, गटारी, आरोग्य, स्वच्छता यांसारखे प्रमुख समस्यांकडे लक्ष देणार असून नागरिकांना जास्तीत जास्त सुखसुविधा देण्यास प्राधान्य असेल. विकास कामाच्या माध्यमातून शहराचा चेहरा-मोहरा बदलवणार व सुंदर शहर आदर्श शहर निर्माण करण्यासाठी प्रयत्न असेल यासाठी सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ यांचे मार्गदर्शन व आपल्या सर्वांचे सहकार्य मला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शहरातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष सलीम पटेल यांचा सत्कार करण्यात आला असून कार्यक्रमाचे सुत्र संचालन अभिजीत पाटील यांनी मांडले.

चाळीसगावात नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी स्वीकारला पदभार
चाळीसगाव । चाळीसगाव नगर परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण यांचा पदग्रहण सोहळा आज दिनांक 26 डिसेंबर 2016 रोजी उत्साहात पार पडला. तत्पूर्वी शहरातून आमदार उन्मेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा, भाजपाचे नगरसेवक आणि उमेदवार यांची सवाद्य, वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. सर्वसामान्यांचा हितासाठी काम करणारी सर्वसामान्यांची नगरपालिका घडविण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला.नगराध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यानंतर मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. यावेळी आमदार उन्मेशदादा पाटील, संपदाताई पाटील, वाडीलालभाउ राठोड, रिपाइं चे जळगाव लोकसभा प्रमुख आनंद खरात, के.बी.साळुंखे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, घृष्णेश्वर पाटील, शेखर बजाज, व विश्वास चव्हाण, प.स. माजी सभापती संजय पाटील यांचेसह नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रावेरला दारा मोहम्मद यांनी स्विकारला पदभार
रावेर- नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी सोमवार 25 रोजी आपला पदभार स्विकारला. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांची उपस्थिती होती. पालिका सभागृहात मावळत्या नगराध्यक्ष रिया पाटील यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांच्याकडे पदभार सुपूर्द केले. यावेळी नगरसेवक सुधीर पाटील, संगिता अग्रवाल, सदिक शेख, हमिदाबी पठाण, संगिता वाणी, अरिफ शेख, अ‍ॅड. एम.ए. खान, शितल पाटील, जगदीश होले, सचिन पाटील, शिरीष वाणी, हमीद शेख, ज्ञानेश्‍वर महाजन, अय्युब पठाण आदी उपस्थित होते.

एरंडोल येथे नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी स्वीकारला पदभार
एरंडोल । नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी मावळत्या नगराध्यक्षा लक्ष्मीबाई महाजन यांचेकडून दुपारी नगराध्यक्ष दालनात आपला पदभार स्विकारला. यावेळी त्यांच्या समवेत खासदार ए.टी.पाटील, जिल्हा भाजपा अध्यक्ष उदय वाघ, संघटन मंत्री किशोर काळकर,तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील,शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील,पारोळा नगराध्यक्ष करण पवार,जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन,अशोक चौधरी,आदी भाजप व शिवसेनेचे नेते उपस्थित होते. दरम्यान एरंडोल नगरपालिकेत भाजपचे चार नगरसेवक, एक अपक्ष व एक काँग्रेस अशा प्रकारे सहा नगरसेवकांचा एक नगराध्यक्ष मिळून सात लोकांच्या गटाची नोंदणी जिल्हा अधिकार्‍यांकडे करण्यात आली होती. भाजपला बहुमतासाठी पाच नगरसेवकांची आवश्यकता होती. दि.25 डिसेंबर रोजी रात्री शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार तथा जिल्हा उपप्रमुख दशरथ महाजन यांच्याशी जुळवून बहुमताचा आकारा नगरसेवकांसह एक नगराध्यक्ष मिळून बारा आकडा जमावाला व पदभार स्वीकारला. यावेळी भाजपचे जेष्ठ नगरसेवक जाहिरुद्दिन शेख कासम यांची भावी उपनगराध्यक्ष म्हणुन त्यांच्या नावाची घोषणाही यावेळी करण्यात आली.तसेच एरंडोल नगरपालिकेत भाजपला नगराध्यक्ष पद मिळाले असले तरी त्यांचे चारच नगरसेवक निवडून आले होते. त्यासाठी भाजपला शिवसेनेचे पाच, काँग्रेसचा एक व अपक्ष एक अस्या कुबड्या घेऊन नगरपालिकेचा कारभार चालवायचा आहे. परंतु भविष्यात नगराध्यक्ष रमेश परदेशी यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यावेळी नगरसेवक नितीन महाजन,कृणाल महाजन, योगेश महाजन, नगरसेविका जयश्री पाटील, आरती महाजन, प्रतिभा पाटील, हर्षाली महाजन, दर्शना ठाकुर, छाया दाभाडे, कल्पना महाजन, भाजप व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ पैकी एकही नगरसेवक यावेळी हजर नव्हते.