जिल्ह्यातील या चार सरपंचांशी ७ रोजी मुख्यमंत्री साधणार संवाद

जळगाव – कोरोना परिस्थीती हाताळण्यासंदर्भातील यशाचे निकष घेऊन जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची माहिती शासनाकडे सादर करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे दि. ७ रोजी दु. ३ वा. सरपंचांशी संवाद साधणार आहे. यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सारोळा खु. येथील सिमा शिवदास पाटील, चोपडा तालुक्यातील विरवाडे, (मालापूर) येथील विशाल आत्माराम म्हाळके, यावल तालुक्यातील मालोद येथील हसीना सिराज तडवी आणि जामनेर तालुक्यातील पहुरपेठ येथील निता रामेश्वर पाटील या चार सरपंचांशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ७ रोजी दु. ३ वा. संवाद साधणार आहेत.