जिल्ह्यातील प्रत्येकाला आर्सेनिक अल्बम 30 चा मोफत डोस द्या

0

भुसावळ : भुसावळ शहरासह जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर, कोरोनाला रोखण्यासाठी आणि सर्व सामान्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढवून कोरोनावर मात करण्यासाठी भुसावळ नगरपरीषदेसह जळगाव जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधीचा मोफत डोस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भुसावळातील शिशिर जावळे यांनी जिल्हाधिकारी तसेच स्थानिक नगरपालिका प्रशासनाकड केली आहे.

सामाजिक संस्थांची घ्यावी मदत
सदर औषधांच्या गोळ्या बनवून त्या वितरीत करण्यासाठी विभागवार वितरीत करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व विविध सामाजिक संस्थांची मदत घेऊन ती विभागवार परीसर व प्रभागनिहाय वितरणाची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी आपण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आर्सेनिक अल्बम थर्टी ही होमिओपॅथिक गोळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घेता येणार नाही. कोरोना नसलेल्यांना ही गोळी घेता येणार आहे याचे कुठलेही प्रकारचे साईड इफेक्ट्स किंवा दुष्पपरीणाम नाहीत. त्यामुळे याचा लाभ लहान मुलांपासून ते वृद्ध गरोदर महिला, मधुमेह व इतर उच्च रक्तदाब व इतर आजार असलेल्या व्यक्तींना सुद्धा घेता येणार आहे तसेच कमी रोग प्रतिकारशक्ती असलेल्या सर्वांना सुद्धा या औषधी गोळ्या घेता येणार आहे. याबाबत आयुष मंत्रालयाने सदर औषधाला रीतसर परवानगी सुद्धा दिलेली आहे व या औषधी गोळ्यांचे सर्वत्र वाटप सुद्धा सुरू आहे. अनेक लोक ह्या गोळ्या घेत आहे. आणि त्यांना त्याचा लाभ मिळून त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढत आहे, असे निदर्शनास आलेले आहे आणि म्हणूनच आपल्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर तालुक्यासह वाढणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या, त्याचा प्रादुर्भाव व त्यातील मृत्यूचे प्रमाण यांचे दर या अतिशय चिंतनीय आहे आणि त्यामुळे या विषाणूंचा संक्रमणाचा वाढता प्रभाव, धोका रोखण्यासाठी व नागरीरकांचे प्राण वाचविण्यासाठी, नागरीकांना या धोक्यातून मुक्त करण्यासाठी, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी भुसावळ शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना त्या शहर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोफत अर्सेनिक अल्बम थर्टी या होमिओपॅथिक औषधांचा मोफत डोस उपलब्ध करून पुरवावा. अशी मागणी साई निर्मल फाऊंडेशनचे भुसावळचे शहर अध्यक्ष शिशिर दिनकर जावळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष रमण भोळे, भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याकडे केली आहे.

Copy