जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 22 हजाराच्या उंबरठ्यावर: नवीन 616 बाधित

0

जळगाव: जिल्ह्यात आज नव्याने 616 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 21 हजार 713 झाली आहे. सर्वाधिक 101 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 5 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 402 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात शनिवारी नव्याने 616 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 101, जळगाव ग्रामीण 34, भुसावळ 30, अमळनेर 42, चोपडा 86, पाचोरा 36, भडगाव 39, धरणगाव 28, यावल 14, एरंडोल 9, जामनेर 36, रावेर 30, पारोळा 52, चाळीसगाव 65, मुक्ताईनगर 1, बोदवड 11, इतर जिल्ह्यातील 2 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 5 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर 2 तर चोपडा, बोदवड आणि रावेर तालुक्यातील प्रत्येकी 1 याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy