जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम: 24 तासात पावणे चारशेपेक्षा अधिक रुग्णांची नोंद

0

जिल्ह्यात कोरोनाचे ३८५ रूग्ण आढळले

जळगावात सर्वाधिक ७३ रूग्ण : १२ रूग्णांचा मृत्यू

जळगाव: जिल्ह्यात आज नव्याने ३८५ कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या १२ हजार ७६६ झाली आहे. सर्वाधिक ७३ कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात १२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात बुधवारी नव्याने ३८५ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ७३, जळगाव ग्रामीण १४, भुसावळ १८, अमळनेर ३८, चोपडा ३२, पाचोरा ३२, भडगाव ७, धरणगाव ३८, यावल ४, एरंडोल ७१, जामनेर ३२, रावेर ३, पारोळा ४, चाळीसगाव १५, बोदवड २ इतर जिल्ह्यातील २ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात १२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, जळगाव तालुका, रावेर तालुक्यात प्रत्येकी ३, चोपडा तालुक्यात २, धरणगाव तालुक्यात एक अशा रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy