जिल्ह्यांंतर्गत बदलीसाठी उद्यापासून वेबपोर्टल सुरु

0

जळगाव । जिल्ह्यातील शिक्षकांची 31 में पर्यत बदली प्रक्र्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अवघड व सोपे क्षेत्राची चाचपणी देखील करण्यात आली आहे. बदली संदर्भात ऑनलाईन वेबपोर्टल सुरु करण्यात आले असून येत्या 6 में पासून जिल्हातंर्गत बदलीसाठी अर्ज मागविण्यात येणार आहे. तालुकानिहाय शिक्षक बदलीच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या असून बदली संदर्भात आक्षेप असल्यास संबंधीत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदविण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितली. अंतर जिल्हा बदलीसाठी देखील वेबपोर्टल सुरु करण्यात आले असून 28 एप्रिल पासून अर्ज मागणविण्यात येत आहे. जामनेर आणि पाचोरा येथे अवघड व सोपे क्षेत्र सर्वेक्षण करतांना घोळ झाल्याचे निदर्शनात आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा सर्वेक्षण करण्यासाठी दोन पथक नेमण्यात आली आहे. पथकाच्या अहवालानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.