जिल्हा हादरला; पुन्हा सात कोरोना बाधीत

0

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संशयित रूग्णांपैकी 54 व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. त्यापैकी सात रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 47 संशयित रूग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना बाधित सात रूग्णांपैकी चार रूग्ण अमळनेर चे असून जळगाव, पाचोरा व भुसावळ च्या प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. हे सर्व रूग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कातील आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या एकतीस इतकी झाली आहे.

अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

Copy