जिल्हा सामान्य रूग्णालय आता ‘कोविड रूग्णालय’ म्हणून घोषित

नॉन कोविड रूग्णांना शाहू महाराज, गोदावरी रूग्णालयाचा पर्याय

जळगाव- जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रूग्णालय आता पुन्हा कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे नॉन कोविड रूग्णांना उपचारासाठी राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज रूग्णालय, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट असलेले जिल्ह्यातील इतर नॉन कोविड खाजगी रूग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील अपघात विभाग हे तात्पुरत्या स्वरूपात सी-१ वार्ड येथेच सुरू ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे.

Copy