जिल्हा रुग्णालयात नवे आरटीपीसीआर यंत्र दाखल

कोरोना चाचण्यांचा वेग वाढणार

नंदुरबार : जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना चाचण्यांसाठी नवे आरटीपीसीआर यंत्र दाखल झाले असून त्यामुळे कोरोना चाचण्यांचा  वेग वाढणार आहे.
सद्यस्थितीत प्रत्येक दिवसाला साधारण 800 ते 1000 चाचण्यांचे अहवाल प्राप्त होत  आहेत. नवे यंत्र क्रियान्वीत झाल्याने लॅबची क्षमता दररोज 1500 पर्यंत क्षमता वाढणार आहे. त्यामुळे अहवालदेखील वेळेत मिळण्यास आणि चाचणीतील विलंब टाळण्यास मदत होणार आहे. आतापर्यंत आरटीपीसीआर लॅबच्या माध्यमातूमन  83 हजार 480 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 20 हजार 719 अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती  जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.