जिल्हा रुग्णालयात दाखल कोरोना संशयित वृध्देचा मृत्यू

0

जळगाव- जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी खाजगी रुग्णालयातून गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल 63 वर्षीय वृध्द महिलेचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला आहे. तिचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतिक्षा असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधीष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. संबंधित वृध्द महिलेला सर्दी, खोकल्यासह श्‍वास घेण्यास त्रास होता. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुुरु होते. तिला शुक्रवारी कोरोना सदृश्य लक्षणे असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती आधीच गंभीर होती. तिच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान शनिवारी तिचा मृत्यू झाला.

Copy