जिल्हा रुग्णालयातील वॉर्डबॉयची गळफास घेत आत्महत्या

जळगाव : शहरातील नेहरू नगरातील 40 वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी रात्री घडला. जतीन जयप्रकाश चांगरे (40, रा.सेंट टेरेसा शाळेसमोर, नेहरू नगर, जळगाव) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
जतीन चांगरे हे पत्नी व दोन मुलांसह नेहरू नगरात वास्तव्यास होते शिवाय ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वार्ड बॉय म्हणून नोकरीस होते. दिवाळीनिमित्त त्यांची पत्नी व दोन्ही मुले माहेरी मनमाड, जि.नाशिक येथे गेल्याने जतीन हे एकटेच घरी होते. सोमवार, 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयात त्यांनी काम केल्यानंतर ते घरी गेले. बुधवारी रात्री 10 वाजता त्यांची पत्नी सुमित्रा ह्या मनमाड येथून घरी आल्या. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. त्यांनी भावाच्या मदतीने घर उघडण्याचा प्रयत्न केला असता दुसर्‍या मजल्यावर जतीन यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. पतीचा मृतदेह पाहून पत्नीने हंबरडा फोडला.,याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जतीनने दोन दिवसांपुर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. मयत जतीन यांच्या पश्चात वडील जयप्रकाश चांगरे, हितेंद्र व खूशाल दोन भाऊ, पत्नी सुमित्रा, मुलगा प्रतीक आणि मुलगी कुंकुम असा परीवार आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.