जिल्हा राष्ट्रवादी चिंतेत: मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह

0

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

मुंबई :  42 दिवसांनंतर महाराष्ट्रात प्रथमच देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण नोंदवले गेले. दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ही माहिती स्वतः ट्विट करत दिली आहे.

 

विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी ते जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीत चिंता वाढली आहे.

 

”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद!” असे जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, याआधी गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील यांनाही मध्यंतरी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा कहर सुरु असताना राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाने गाठले होते. आता कोरोनाने पुन्हा तोंड वर काढले आहे.

Copy