जिल्हा बँक ब्रेकिंग : माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर बँकेचे चेअरमन.

जळगाव – जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन पदी मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची निवड करण्यात आली आहे तर वाईस चेअरमन पदी शामकांत सोनवणे वर्णी लागली आहे.

जिल्हा बँकेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महा विकास आघाडीतर्फे नक्की कोण चेअरमन होणार याची उत्सुकता संपूर्ण जळगाव जिल्ह्याला लागली होती. याठिकाणी बरेच नाव पुढे येत होते मात्र जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची जिल्हा बँकेच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे.