Private Advt

जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार संतोष चौधरींतर्फे वकीलांनी मांडली विभागीय आयुक्तांकडे बाजू

भुसावळ : जिल्हा बँक निवडणुकीसाठी रंगत आली असतानाच भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष छबीलदास चौधरी यांच्यासह अनेक दिग्गजांचे अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या संदर्भात संतोष चौधरी यांनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्याकडे अपिल दाखल केले होते. या अपिलावर मंगळवार, 26 रोजी विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांच्याकडे चौधरी यांच्यातर्फे अ‍ॅड.विक्रम पवार यांनी बाजू मांडली.

न्याय प्रक्रियेवर आपला विश्‍वास : माजी आमदार चौधरी
आपल्याविरोधात कट कारस्थान रचण्यात आले असून न्याय प्रक्रियेवर आपला विश्‍वास असल्याचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी कळवले आहे.

निर्णयाकडे लागले लक्ष
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत महाविकास आघाडीच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. दरम्यान, माधुरी अत्तरदे, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, भारती चौधरी, नाना पाटील, दिलीप पाटील यांच्यासह 9 उमेदवारांच्या अपिलावर बुधवारी विभागीय सहनिबंधक लाटकर यांच्या दालनात सुनावणी पूर्ण झाली. विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.