जिल्हा बँक निवडणूक : कल्पना पाटील यांचा ‘सहकार’ पॅनलला पाठिंबा

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील शेतकरी विकास पॅनलमधील महिला राखीव प्रवर्गातील उमेदवार व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा कल्पना शांताराम पाटील यांनी सहकार पॅनलच्या महिला प्रवर्गातील उमेदवार अ‍ॅड.रोहिणी प्रांजल खडसे-खेवलकर यांना व सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना आपला पाठींबा जाहीर केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, नगरसेवक प्रा.डॉ.सुनील नेवे, प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, राजुभाऊ माळी, विलास धायडे, किरण कोलते, अ‍ॅड.बोधराज चौधरी, बापू महाजन, शफी पेहलवान, एजाज खान, उसामा रउफ खान, अखिल चौधरी, सुमित बर्‍हाटे, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

Copy