जिल्हा बँकेसाठी निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून उपनिबंधक बिडवई यांची नियुक्ती

जळगाव – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता लवकरच जिल्हा बँकेच्या रणधुमाळीला सुरवात होणार आहे.
कोरोनामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तब्बल दीड वर्षापासून लांबली होती. सध्या कोरोनाची परिस्थीती नियंत्रणात असल्याने राज्य शासनाने सहकार क्षेत्राशी संबंधित संस्थांच्या निवडणूका घेण्याला परवानगी दिली आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादी प्रसिध्दीचा कार्यक्रम पार पडला असून आता प्रत्यक्ष निवडणुकीची घोषणा होणार आहे.