Private Advt

जिल्हा बँकेसाठी दुपारी २ पर्यंत ७८.४८ टक्के मतदान

जळगाव – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून दुपारी २ वाजेपर्यंत ७८.४८ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली. यात जळगाव मतदान केंद्रावर ७७.२५ टक्के, भुसावळ ८६.३३, यावल ६९.३७, रावेर ७५, मुक्ताईनगर ९२.११, बोदवड ९८.३३, जामनेर ७५.८५, पाचोरा ८०.८७, भडगाव ९२.१९, चाळीसगाव ८७.४३, पारोळा ८४.०२, अमळनेर ८१.७२, चोपडा ६६.६७, धरणगाव ७३.१९, एरंडोल ७४.५५ असे एकुण ७८.४८ टक्के मतदान झाले आहे.