Private Advt

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

२१ नोव्हेंबर रोजी होणार प्रत्यक्ष मतदान

जळगाव – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी सोमवारी दि. ११ ऑक्टोबर पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याला सुरवात होणार असून दि. २१ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात दि. ११ ऑक्टोबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला सुरूवात होणार असून दि. १८ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. दि. २० रोजी छाननी होणार आहे. दि. २१ पासून ते ८ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत राहणार आहे. त्यानंतर अंतीम उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार असून दि. २१ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर दि. २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.