Private Advt

जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी ३ रोजी निवडणूक

जळगाव – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमनपदाच्या निवडीसाठी दि. ३ डिसेंबर रोजी दु. १ वा. अध्यासी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया होणार आहे. दि. ३ रोजी दुपारी १ ते १.१५ वा. नामनिर्देशनपत्र दाखल करणे, दु. १.१५ ते १.२५ वा. नामनिर्देशनपत्राची छाननी, दु. १.३० वा. छाननी, दु. १.३५ ते १.४५ अर्ज माघार घेणे, दु. १.५० वा. उमेदवारांची यादी जाहीर करणे दु. २ ते २.३० यावेळेत आवश्यकता असल्यास मतदान (गुप्त पध्दतीने), मतदानानंतर निकाल जाहीर करणे असा कार्यक्रम निश्‍चीत करण्यात आला आहे. ही निवड प्रक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे.