जिल्हा पोलीस अधीक्षक कराळेंनी स्विकारला पदभार

0

जळगाव । जळगाव जिल्हा पोलीस दलाचे गुरूवारी नवनिर्वाचित जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी गुरूवारी सकाळी 11.30 वाजता यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाचा पदभार स्विकारला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग, डॉ. जालिंदर सुपेकर उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांची नाशिक येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी नाशिक शहर उपायुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झाली होती. तसेच अपर पोलीस अधीक्षका मोक्षदा पाटील यांचीही वाशिम येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी बच्चनसिंग यांनी नियुक्ती करण्यातली आली होती. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. कराळे यांनी पदभार स्विकारताच कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. नवीन एसपी कराळे यांच्यावर जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांवर अंकुश आणण्याचे आव्हान आहे.