जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भुसावळ शहराचा घेतला आढावा

0

भुसावळ : शहरात वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव व ठिकठिकाणी वाढलेले कंटेन्मेंट झोनमध्ये असलेल्या बंदोबस्ताची सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी पाहणी केली. याप्रसंगी पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची देखील डॉ.उगले यांनी चौकशी करून माहिती जाणून घेतली. शहर पोलिस ठाण्यात अधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्यात आली.

उपाययोजनांबाबत अधिकार्‍यांची घेतली आढावा बैठक
जिल्हा पोलिस अधीक्षकांंनी शहरातील अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. त्यात वाढत चाललेले रुग्ण, कंन्टेमेंट झोन व रुग्णांबाबत तसेच लावण्यात आलेल्या एकूण बंदोबस्ताचा आढावा घेतला. दरम्यान, शहर, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाण्यासह शहर वाहतूक शाखा, निर्भया पथक यातील कर्मचार्‍यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी तसेच परीवारात कुणी आजारी आहेत वा काही समस्या आहेत याची त्यांची आस्थेवाईकपणे माहिती जाणून घेतली.

यांची होती उपस्थिती
यावेळी डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार आदी उपस्थित होते.

Copy