जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपाचाच झेंडा

0

जळगावात महाविकास आघाडीचा प्रयत्न फसला : राष्ट्रवादीचे – काँग्रेसचा एक सदस्य फुटला

जळगाव – जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या रंजना प्रल्हाद पाटील ह्या विजयी झाल्या. तर उपाध्यक्ष म्हणून भाजपाचे लालचंद पाटील हे निवडून आले. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसच्या एका सदस्याने भाजपाच्या बाजूने मतदान केले. तर भाजपाचे एक सदस्य गैरहजर राहीला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार रेखा राजपूत ह्या पराभूत झाल्या. जळगावात महाविकास आघाडीचा प्रयत्न फसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.

Copy