जिल्हा दौर्‍यांवर आजी,माजी मुख्यमंत्र्यांचा येण्याचे संकेत

0

नंदुरबार । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्षातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य नेते एप्रिलमध्ये नंदुबारला येणार असल्याचे समजते. या आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. यातूनच शहरात मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. नंदुरबार नगरपरिषदेने केलेल्या विविध विकास कामांच्या उद्घटनासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर नेते येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत.

आगामी नगरपालिका निवडसूकीच्या दृष्टीने या कार्यक्रमाला महत्व राहणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नवीन तहसिल कार्यालयाच्या तसेच बहुचर्चींत हातोडा पुलाच्या उद्घटनासाठी नंदुरबार दौर्‍यांवर येण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँगे्रसमधील एक गट भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणारे कार्यक्रमनिमित्त असले तरी या कार्यक्रमातून मोठ्या राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. नंदुरबार पालिका निवडणूकीच्या दृष्टीने या घडामोडी होणार असल्याचे संकेत राजकीय गोटातून मिळत आहे.