जिल्हा कारागृहातून ४१ कैद्यांची सुटका

0

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश : घरापर्यंत सोडले

जळगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी जिल्हा कारागृहातील ४१ कैद्यांची (बंदी) जामिनावर सुटका करण्यात आली. त्यामध्ये २८ कैद्यांना बंदी ४५ दिवसाच्या अंतरिम जामीन वर मुक्त करण्यात आले. तर उर्वरितांना नियमित जामीनावर मुक्त करण्यात आले. या सर्व कैद्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी मुक्त झालेल्या कैद्यांना घरापर्यंत सोडण्यासाठी वाहने उपलब्ध करून दिली. तसेच नियमित जामीन झालेले १३ कैदी आहेत.

कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सात वर्षांच्या आतील शिक्षेचे कलम असलेल्या गुन्ह्यातील कैद्यांची कारागृहातून सुटका करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात दिले होते. त्यानुसार कारागृहाकडून अशा कैद्यांची माहिती मागविण्यात आली होती. त्याची पुर्तता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या स्तरावर झाल्यानंतर सोमवारी ४१ कैद्यांची सुटका झाल्याची माहिती कारागृह अधीक्षक आशिष गोसावी यांनी दिली.