जिल्हा काँग्रेस २ लाख डिजीटल सदस्य नोंदणी करणार

डॉ. उल्हास पाटील यांची जिल्हाध्यक्षांकडुन डिजीटल सदस्य नोंदणी

जळगाव – जिल्हा काँग्रेसतर्फे डिजीटल सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या सदस्य नोंदणीनंतर आता माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचीही जिल्हाध्यक्ष तथा चीफ एन्रॉलर प्रदीप पवार यांनी डिजीटल सदस्य नोंदणी करून घेतली.
आगामी काळात होणार्‍या निवडणुकांसाठी प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार जिल्हाभरात संघटना मजबुत करण्याचे काम सुरू आहे. यासाठी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान पक्ष संघटना वाढिसाठी जिल्हा काँग्रेसतर्फे डिजीटल सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष शाम तायडे यांनी प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षा पाटील यांची डिजीटल सदस्य नोंदणी करून सुरूवात केली. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा चीफ एन्रोलर प्रदीप पवार यांनी आज डॉ. उल्हास पाटील यांची डिजीटल सदस्य नोंदणी केली.
२ लाख सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट
यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांची संयुक्त बैठक झाली. यात जिल्ह्यातील ३५० कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन २ लाख डिजीटल सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट निश्‍चीत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, जमील शेख, मनोज सोनवणे आणि आशुतोष पवार उपस्थीत होते.