जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत गरूड महाविद्यालयाचे यश

0

शेंदूर्णी – येथील अप्पासाहेब र.भा.गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची बारावीत शिकणारी विद्यार्थीनी नेहा एकनाथ कोळी ही ७ व ८ ऑक्टोबर २०१८ दरम्यान चाळीसगाव येथील कोतकर महाविद्यालयात जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ७२ किलो वजनगटात विजयी झाली. तर वैशाली प्रभाकर सुरवाडे अंतिम कुस्ती स्पर्धेत ६० किलो गटात उपविजेता झाली. तसेच ८ ऑक्‍टोबर रोजी झालेल्या मुलांच्या स्पर्धेमध्ये ६३ किलो वजन गटांमध्ये अंकेत वानखेडे अंतिम कुस्तीमध्ये उपविजयी झाला व बारावीत शिकणारा विद्यार्थी पवन विनोद चव्हाण हा ९२ किलो वजन गटात अंतिम कुस्ती स्पर्धेत उपविजयी ठरला आहे. या सर्वांचे संस्थेचे चेअरमन संजय गरुड तसेच सचिव सगरमल जैन, सहसचिव दिपक भाऊसाहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक आर.जी.पाटील, प्रा.महेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Copy