जिल्हाधिकारी, डीन तातडीने बदलणार

0

जळगाव – येथील जिल्हा रूग्णालयात बाथरूममध्ये कोरोना बाधित महिलेचा मृतदेह आढळुन आला होता. यासंदर्भात एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधुन तक्रार केली. त्यावर या प्रकरणाची दखल घेण्यात आली असुन जिल्हाधिकारी, डीन यांची तातडीने बदली करून अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन ना. अजित पवार यांनी दिले.

जिल्ह्यातील कोरोणा रुग्णालयामध्ये बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह आढळुन आल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. या संपूर्ण प्रकाराची माहिती जिल्हा एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना दिली. जळगाव जिल्ह्याला कोरोणापासुन वाचवायचं असेल, तर जिल्ह्याचे प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांची तातडीने बदली करा व त्यांच्या जागी सक्षम व कार्यक्षम जिल्हाधिकारी द्या अशा प्रकारची मागणी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

बदलीबाबत लवकरच निर्णय

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, डीन डॉ. भास्कर खैरे यांची तातडीने बदली करून दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना दिले आहे. लवकरच जिल्हाधिकारी यांची बदली होऊन नवीन जिल्हाधिकारी जळगाव जिल्ह्याला मिळणार असल्याचे संकेत आहे.

Copy