जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली : नूतन जिल्हाधिकारीपदी अमन मित्तल

Aman Mittal as the new Collector of Jalgaon district: Abhijit Raut’s transfer to Nanded जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारीपदी अमन मित्तल यांची नियुकती करण्यात आली असून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. गुरुवारी राज्य शासनाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढल्े आहेत. जळगावात बदलून येत असलेले मित्तल हे यापूर्वी लातूर मनपाचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. याबाबतचे आदेश प्रधान सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांनी काढले आहेत.

कोरोना काळात उत्कृष्ट कार्य
जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गेल्या अडीच वर्षांच्या काळात जिल्ह्यातील कोरोना स्थितीत अत्यंत उत्कृष्टरीत्या सांभाळल्याने त्यांचे राज्यभर कौतुक झाले मात्र कार्यकाळ पूर्ण झाल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली झाली.

मित्तल 2015 बॅचचे अधिकारी
जळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी अमन मित्तल हे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. त्यांची जळगाव जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. नूतन जिल्हाधिकारी अमन मित्तल हे 2015 बॅचचे जिल्हाधिकारी असून त्यांची आजवरची कारकीर्द उत्तम राहिली आहे. मित्तल यांनी नाशिक, कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर मनपा आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. महापूर काळात आणि कोरोना काळात त्यांनी आघाडीवर राहून काम केले होते. जळगाव जिल्ह्याला सलग दुसर्‍यांदा तरुण, तडफदार अधिकारी लाभले आहेत.