जिल्हयात नवीन 205 कोरोनाबाधीत रुग्ण ; दिवसभरात 12 मृत्यू

0

 

जळगाव : जिल्ह्यात आज नव्याने 205 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 10 हजार 249 झाली आहे. सर्वाधिक 60 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 12 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 231 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात मंगळवारी नव्याने 205 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 60, जळगाव ग्रामीण 18, भुसावळ 20, अमळनेर 8, चोपडा 5, पाचोरा 13, भडगाव 8, धरणगाव 25, यावल 7, एरंडोल 4, जामनेर 9, रावेर 20, पारोळा 1, चाळीसगाव 6, व इतर जिल्ह्यातील 1 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 12 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, चाळीसगाव तालुका, जळगाव तालुका, याठिकाणचे प्रत्येकी 2 तर अमळनेर, भडगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर व भुसावळ या तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Copy