जिनिंग मिलला आग लागून 2 कोटींचा कापूस खाक

0

धुळे । येथील एकविरा कॉटेक्स प्रा.लि ह्या जिनिंग फॅक्टरीमध्ये आग लागून तब्बल दोन कोटी रूपयाचा कापूस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान दोन तास सुरू असलेल्या या अग्नितांडवाला विझवण्यासाठी पन्नासहुन अधिक पाण्याचे बंबाची मदत घेऊन विझवण्यात आले.

अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी जिनिंगच्या कंपाऊड मध्ये असलेल्या विहिरीतील पाण्याच्या मदतीने ताबडतोब आग विझवायला सुरवात केली. परंतू आग आटोक्यात येत नसल्यामुळे धुळे मनपाचे सहा तर मालेगाव मनपाचा एक बंब असे सहा बंबानी आग विझवण्यात आली. मात्र या आगीत कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्रतिक्रीया मयंक अग्रवाल यांनी दिली. या आगीचे कारण कापुस पिंजला जात असतांना मशिनमध्ये खडा आल्याने शार्ट सर्किट होवून आग लागली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे.

क्षणार्धात आगीचे रौद्ररूप
मुंबई आग्रा महामार्गावरिल आर्वी गावाच्या शिवारात धुळे येथील पवनकुमार अग्रवाल व मयंक अग्रवाल यांची एकविरा कॉटेक्स नाचाची जिनिंग प्रेस आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जिनिंगला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रूद्ररूप धारण केल्यामुळे जिनिंगमधील जवळपास दोन कोटी रूपयाचा कापूस जळून खाक झाला. दरम्यान या घटनेची माहिती कामगारांनी मालक मयंक अग्रवाल यांना दिली. धुळे मनपाच्या अग्निशामनक विभागाला पाचारण करण्यात आले.