बीएचआर प्रकरण: कंडारेकडून नियमबाह्य कोटयवधींची अनामत परत

1

संशयित जितेंद्र कंडारे याच्यासह निविदाधारकांच्या अडचणींत वाढ;निविदा भरतांनाच कंडोरकडून अनामत रक्कम करण्याबाबतचे पत्र

जळगाव: शहरातील एमआयडीसीत मुख्य कार्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी को ऑपरेटीव्ह संस्थेच्या घोटाळ्यात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. बीएचआरच्या मालमत्ता विक्री करतांना अवसायक जितेंद्र कंडारे याने नियमात नसतांनाही नियमबाह्य पध्दतीने अनामत म्हणून घेतली कोट्यवधींची रक्कम निविदा धारकांना निविदा रद्द झाल्यानंतरही पुन्हा परत केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नियमबाह्य बाबीमुळे संशयित जितेंद्र कंडारे यांच्यासह बीएचआरच्या मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणार्‍यांच्या अडचणींत वाढ होणार आहे. असे मत विधीतंज्ञांनी बोलतांना व्यक्त केले आहे. दरम्यान बीएचआरची बेकायेदशीरपणे मालमत्ता खरेदी करणार्‍यांनाही गुन्ह्यात आरोपी केले जाणार असून चौकशीअंती त्यांनाही ताब्यात घेण्यात येणार असल्याचे संकेत आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळाले आहेत.

निविदा रद्द केल्यावरही अनामत परत करण्याचे थेट पत्रच
बीएचआरच्या घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने पुणे येथील दाखल गुन्ह्यात तपासाला गती दिली आहे. बीएचआरच्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आहेत. बीएचआर अवसानात गेल्यानंतर याठिकाणी अवसायक म्हणून नियुक्ती झाल्यावर जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती झाली. कंडारे यांनी नियमबाह्य पध्दतीने कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्ता कवडीमोल भावात विक्री केल्या आहे. यामुळे हा घोटाळा 1100 कोटी रुपयांचा असल्याचेही ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. खडसेंनी दिलेल्या कागदपत्रांनुसार यात जळगाव शहरासह रायगड, सातारा, पुणे, नाशिक अशाप्रकारे राज्यभरातील विविध ठिकाणच्या अनेकांनी बीएचआरच्या मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरल्या होत्या. बीएचआरच्या मालमत्ता या विक्री करत असतांना जितेंद्र कंडारे याने निविदा भरणार्‍यांना पत्र दिले होते. 2018 च्या संदर्भीय पत्रानुसार याच पत्रात निविदेची रक्कम आपणास परत करुन निविदा रद्द करण्यात येईल असा उल्लेख केला आहे. निविदा रद्द झाल्यांनतर अनामत रक्कम परत करेण ही नियमबाह्य होती.

70 टक्के रक्कमेतून पावत्यांव्दारे भरण्याची शक्कल
यात 2018 मध्ये दिलेल्या पत्रांच्या संदर्भानुसार पत्रात संबंधित मिळकतीची एकूण रक्कम तसेच त्या रकमेपैक्ी अनामत रक्कम भरल्याचा उल्लेख आहे. याच पत्रात कंडोरेने निविदाधाकरास एकूण रक्कमपैकी 30 टक्के डीडीव्दारे, तसेच 70 टक्के रक्कम संस्थेत ठेवलेल्या फिक्स डिपॉजिटच्या पावत्यांव्दारे भरण्याची अट घातली होती. तसेच
डिपॉझिटच्या पावत्यांऐवजी 100 टक्के रक्कम डी.डी.. आरटीजीएसव्दारे भरण्यास तयार असल्यास 45 दिवसाच्या आत खुलासा करण्याबाबत म्हटले होते. तसेच खुलासा न केल्यास निविदेची अनामत रक्कम परत करुन निविदा रद्द करण्यात येईल असे सदरच्या पत्रात नमूद आहे. असे पत्र मालमत्ता विक्री करतांना प्रत्येक निविदाधारकाला कंडारे याने दिल्याचे खडसेंनी दिलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते.

17 कोटींहून अधिक अनामत रक्कम केली परत
खडसेंनी दिलेल्या कागदत्रानुसार यात काहींनीच मालमत्ता खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. इतरांनीची प्रक्रिया बाकी आहे. तर काहीची प्रकिया रद्द झाली आहे. निविदा रद्द झालेल्यांना नियमात नसतांना अनामत रक्कम जितेंद्र कंडोरे यांच्याकडून परत करण्यात आली आहे. ही रक्कम 17 कोटीहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनामत रक्कम परत करुन कुंपणानेच शेत खाल्ले याप्रमाणे कंडोरे संस्थेचे नुकसान तर केलेच शिवाय मोठ्या प्रमाणावर घोटाळा केला आहे. आधीच घोटाळ्यामुळे अडचणीत असलेल्या कंडारेच्या बेकायदेशीररित्या अनामत रक्कम केल्याच्या या नियमबाह्य प्रकारामुळे अडचणींमुळे वाढ होणार आहे. तर दुसरीकडे निविदारधारकांचाही ‘खाया पिया कुछ नही और गिलास फोडा बारा आणा’ याप्रमाणे डोक्याचा ताप वाढणार आहे. असून अशाप्रकारे निविदा भरणारे तसेच व्यवहार करणारेही पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहे. चौकशीअंती त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Copy