जितू रायचा सुवर्णवेध

0

नवी दिल्ली : जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचे सगळयात मोठे आशास्थान असलेल्या जितू रायने बुधवारी ५० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तर भारताच्याच अमनप्रीत सिंगने सिल्व्हर मेडल जिंकत चार चांद लावले. मंगळवारी जितूला 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते. जितूच्या कांस्यबरोबरच या स्पर्धेतील भारताची पदकसंख्या पाच झाली आहे. सोमवारी हिना सिद्धू समवेत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारातील मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावणार्‍या जितुने ५० मीटर एअर पिस्तुल प्रकारातही सुवर्ण कामगिरी केली आहे. जितू रायच्या तिजोरीत आता विश्वचषक स्पर्धेची एकूण ९ पदके जमा झाली आहेत. या कामगिरीमुळे भारतीय चाहत्यांकडून जितू रायचे अभिनंदन केले जात आहे.

सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा
भारताचा नेमबाज जितू राय याने दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत ५० मी एअर पिस्तुलमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. तर अमनप्रीत सिंग याने स्पर्धेत दुसरे स्थान पटकावत रौप्य पदकावर नाव कोरले आहे. जितू रायचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले आहे. मंगळवारी जितू रायने १० मी एअर पिस्तुलमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. त्यानंतर आज ५० मी एअर पिस्तूल प्रकारात जितूने आपल्या शानदार सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर अमनप्रीतने विश्वचषक स्पर्धेच्या पदार्पणातच रौप्यपदक जिंकण्याची किमया केली. अमनप्रीतला २२६.९ गुणांसह दुसरे स्थान मिळाले. इराणचा नेमबाज वाहिद गोल्खांदन २०८ गुणांसह कांस्य पदकाचा मानकरी ठरला.

अमनप्रीतचे पदार्पणातच रौप्यपदक
स्पर्धेच्या पात्रता फेरीत अमनप्रीत ५६१ गुणांसह जितू रायपेक्षा आघाडीवर होता. जितू रायला पात्रता फेरीत ५५९ गुण मिळाले होते. मात्र, मुख्य लढतीत जितू रायने आपल्या अनुभवाच्या जोरावर अप्रतिम कामगिरी केली आणि ‘सुवर्ण’वेध घेतला. जितू रायच्या तिजोरीत आता विश्वचषक स्पर्धेची एकूण ९ पदके जमा झाली आहेत. यात यंदाच्या स्पर्धेतील दोन पदकांचाही समावेश आहे. जितूने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही लक्षवेधी कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र स्पर्धेत जितूला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत १० मी एअर पिस्तुलमध्ये कांस्यपदकासह मिश्र दुहेरीत देखील जितू रायने महिला नेमबाद हिना सिंग हिच्यासोबत सुवर्णपदक पटकावले. जितू राय आणि हिना सिंग यांनी मिश्र प्रकारातील १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम लढतीत जपानच्या जोडीचा पराभव केला होता.