जावयानेच केला सासुचा विनयभंग : चाळीसगाव तालुक्यातील घटना

The son-in-law molested the mother-in-law : an incident in Chalisgaon taluka चाळीसगाव : माहेरी आलेल्या बायकोला सासरी नेण्यानिमित्त आलेल्या जावयाने सासुचाच अश्‍लील शब्दप्रयोग करून विनयभंग केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली. या प्रकरणी जावयाविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कौटुंबिक वादातून पत्नी माहेरी
अमळनेर येथील तरुणाची सासुरवाडी चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील असून कौटुंबिक वादानंतर पत्नी माहेरी आल्या आहेत. पत्नीला घेण्यासाठी पती हा सासुरवाडीला शनिवार, 24 सप्टेंबर रोजी आल्यानंतर पत्नीने सोबत जाण्यास नकार दिला. त्यावेळी पत्नीची आई (सासू) देखील घरीच होती. यावर जावयाने सासूला उद्देशून बोलत माझी बायको तुमच्याकडे आहे, तिला माझ्यासोबत आत्ताच पठवा, नाहीतर तुम्हीच माझ्यासोबत चला अशी अर्वाच्य भाषा वापरत सासूचा हात पकडण्यात आला व महिलेच्या अंगावरील साडी ओढून विनयभंग करण्यात आला तसेच शालकाचा पाहून घेईन अशी धमकी देत शिवीगाळ करून निघून गेला.

मेहुणबारे पोलिसात गुन्हा
या संदर्भात सासूने मेहुणबारे पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने जावयावर मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल देविदास पाटील करीत आहे.