जामुनझिरा वृक्ष तोड प्रकरणाची भीम आर्मीकडून दखल

1

यावल : तालुक्यातील जामुनझिरा यावल येथील या गावात झालेल्या अरण्य भंते महानाम भंते यांच्या कुटीयावर झालेल्या तिरस्कारी हल्ला व बोधी वृक्षांची नासधुस अज्ञाताकडून झाल्याने भीम आर्मीने या प्रकरणाची दखल घेत आज शुक्रवार. 29 रोजी 21 वृक्ष लागवड करून निषेध व्यक्त केला. यावेळी अनेक संघटनांनी समर्थन केले जामुनझिरा, ता.यावल येथे 25 एप्रिल रोजी कुटीवरती झालेल्या तिरस्कारी हल्ला व बोधी वृक्षांची नास धुस बाबत जामुनझिरा येथे भीम आर्मीने (झाडे लावा, झाडे जगवा) म्हणजेच एक झाड तोडले तर त्या परीसरात 21 झाडे लावून महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण भारत भर संदेश दिला आहे तसेच या कोरोना महामारीच्या काळात भीम आर्मीने सोशल डिन्स्टन्स पाळून हे आंदोलन केले व अनेक संघटनांनी सोबत येवून अरण्य भंते महानाम भंते यांना मदत केली व स्थानिक पोलिस प्रशासनास निवेदन दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भीम आर्मी ने कली आहे. भविष्यात जर अरण्य भंते महानाम भंते यांच्या जीवास काही बरे वाईट झाल्यास किंवा त्यांच्या विद्यार्थी वर्गास काही झाल्यास यावल पोलिस प्रशासन, यावल वनविभाग तसेच महसूल विभाग जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन शिंग, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नेहा शिंदे, केंद्रीय समिती सदस्य अशोक कांबळे, उत्तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राहुल भाई वाघ, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता रमाकांत तायडे, जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, जिल्हा उपसंघटक सागर मेघे, जिल्हा सचिव सूपडू संदानशीव, संदीप तायडे, यावल तालुकाध्यक्ष हेमराज तायडे, प्रभारी तालुकाध्यक्ष भूषण साळुंखे, उपाध्यक्ष आकाश तायडे, भीम आर्मी मोहराळा शाखा अध्यक्ष गौरव सोनवणे, चुंचाळे बोराळे शाखाध्यक्ष शिवाजी गजरे, निखील सावळे, नायगाव भीम आर्मी शाखाध्यक्ष भीमराव सावळे, सांगवी भीम आर्मी अध्यक्ष विक्की तायडे, हिंगोणा भीम आर्मी अध्यक्ष प्रशांत तायडे, न्हावी भीम आर्मी अध्यक्ष विजय तायडे, किनगाव भीम आर्मी अध्यक्ष योगेश सावळे, आकाश साळुंखे, तुषार सोनवणे, रोहन निकम, प्रसंजित सोनवणे, भीम आर्मी सदस्य शंकर सावळे उपस्थित होते तसेच मांग मातंग जोडणारी सामाजिक संघटना यावल तालुका कोषाध्यक्ष नाना अवचार, पीआरपी यावल तालुका अध्यक्ष राहुल साळुंखे, भूषण भालेराव, विवेक तायडे, भारतीय विद्यार्थी मोर्चा जिल्हा सचिव आकाश तायडे , भीम आर्मी मोहराळा सचिन वानखेडे तसेच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Copy