भुसावळातील तरुणाचा नशिराबादला खून

दोघा आरोपींना नशिराबाद पोलिसांकडून अटक : खुनाला पूर्व वैमनस्याची किनार

नशिराबाद : खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या भुसावळातील धम्मप्रिय मनोहर सुरळकर (19) या तरुणाचा चाकूचे वार करून तसेच गोळी झाडून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता नशिराबाद महामार्गावरील सुनसगाव पुलानजीक घडली. दोघा संशयीतांनी चढवलेल्या हल्ल्यात मयत तरुणाचे वडील मनोहर आत्माराम सुरळकर (45, रा.पंचशील नगर, भुसावळ) हे जखमी झाले आहेत. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, मंगळवारी रात्री खुनातील दोघा हल्लेखोरांना अटक करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले.

तरुणाचा जामिनावर सुटताच खून
गतवर्षी 11 ऑक्टोबर 2020 रोजी कैफ शेख जाकीर (17) या तरुणाचा भुसावळातील पंचशील नगरात डोक्यात रॉड मारल्याने मृत्यू झाला. या गुन्ह्यात पाच संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्या आला होहता. त्यात धम्मप्रिय हादेखील आरोपी होता. गुन्हा घडल्यापासून धम्मप्रिय हा कारागृहातच होता. मंगळवारी तो जामिनावर कारागृहातून बाहेर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघा संशयितांनी गुन्ह्याची योजना आखली. धम्मप्रिय व त्याचे वडील दोघे दुचाकीने घरी जात असताना सुनसगाव पुलाजवळ दोघे येताच दोघा आरोपींनी सुरळकर पिता-पूत्राच्या डोळ्यात मिरची पूड डोळ्यात टाकली आणि धम्मप्रियवर चाकूने हल्ला चढवत दोन गोळ्या झाडल्या तर मनोहर यांच्यावर चाकूने वार केले. चाकूचे वार गळ्यावर करण्यात आल्याने धम्मप्रिय जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, रात्री उशिरा दोघा संशयितांना नशिराबाद पोलिसांनी अटक केली.

Copy