जामनेर शहरात अंतर्गत भुयारी गटारींसाठी निधी मंजूर

0

जामनेर । जामनेर शहराकरिता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत भुयारी गटार (जलनिस्सारण व सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह) प्रकल्प राबविण्यास राज्यस्तरीय समितीने मान्यता दिली आहे.

निविदा प्रक्रियेनंतर कामास लवकर सुरूवात होणार
सदर योजनेचा खर्च 66.54 कोटी व निव्वळ व 70.06 कोटी ढोबळ असा आहे. या योजनेकरिता 85 टक्के शासकीय अनुदान व 15 टक्के रक्कम नगरपरिषद हिस्सा असा वित्तीय आकृतीबंध आहे. सदर योजने अंतर्गत शहरात एकूण 112 कि.मी. लांबीची भुयारी गटारचे काम असून शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता 8.00 दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारून सदरचे पाणी शेती वापरासाठी देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत शौचालय व सांडपाणी हे भुयारी गटारद्वारे नेवून त्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सांडपाणी प्रक्रिया करण्यात येणार आहे.

माहिती देतांना यांची उपस्थिती
सदरची कामे मंजूर होणेसाठी जलसंपदा व वैद्यकिय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांनी परिश्रम घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे विकास कामांसाठी नगरपरिषदेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झालेला आहे. जलसंपदामंत्री ना. निरीष महाजन यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा साधना महाजन, नगरसेवक श्रीराम महाजन, छगन झाल्टे, गटनेता महेंद्र बाविस्कर, जितेंद्र पाटील, माधव चव्हाण, परवेज खान, गफ्फार भंगारवाले, अभियंता सी.एन. खर्चे आदी उपस्थित होते.