जामनेर तालूका एज्यु.सोसा. दुसऱ्या गटातील सदस्यांची निवड

0

सचिवपदी सुरेश धारिवाल तर सहसचिवपदी राजेंद्र पाटील

जामनेर – विवादीत जामनेर तालूका एज्युकेशन सोसायटीची निवडणूक गत ३० तारखेला दोन्ही गटाकडून करण्यात आली. दोन्ही गटाकडून संस्थेच्या संचालक मंडळवर आपलाच दावा आहे. असे सांगण्यात येवून. त्याच अनूषंगाने एका गटाकडून ६ आक्टोबरला बैठक घेवून संचालक मंडळालातील सचिव, सह सचिव पदाची निवड करण्यात आली. त्यानंतर आज ७ आक्टोबरला दुसऱ्या गटाकडून बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व सहमतीने पुन्हा एकदा संस्थेच्या सचिवपदी सुरेश मनोहरलाल धारिवाल यांची तर सहसचिवपदी राजेंद्र लक्ष्मण पाटील यांची नावे घोषीत करण्यात आली.

शुभेच्छांचा वर्षाव
बैठक संस्थेचे अध्यक्ष पारस ललवाणी यांच्या अध्यक्षतेखाली फार्मसी कॉलेजमधे घेण्यात आली. यावेळी संचालक मंडळालातील ईश्वर मंडलेचा, लक्ष्मण माळी, प्रेमचंद भंडारी, डॉ.सचिन बसेर, पवन राका, शंकर राजपूत, माधव चव्हाण, अनूज धारिवाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

-फोटो आहे

Copy