जामनेर तालुक्यात दहा हजारांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण बरा होण्याचा दर वाढला. बधितांची व उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या झाली आहे. दुसर्‍या लाटेत शहरी व ग्रामीण भागात लग्न समारंभ,अंत्ययात्रा, दारावर जाण्याची प्रथा,बाजार इ कोव्हिडं नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोना चा संसर्ग झपाट्याने वाढला. पहिल्या लाटेपेक्षा तो अधिक होता. सुरुवातीला शहरी भागात व नंतर ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळून आले. तालुक्यात एकूण 11079 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले पैकी 10795 बरे झाले तर 145 रुग्णांचा मृत्यू झाला. 139 रुग्ण हे सध्या उपचार घेत आहेत.
दुसर्‍या लाटेत मृत्यूचे प्रमाण हे अधिक होते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मृत्यु अधिक झाले आहेत. तालुक्याचा बरे होण्याचा दर हा 94.16 टक्के असून पॉझिटिव्हीटी दर 2 टक्के खाली आला आहे. मृत्यू दर हा 1.31 इतका आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संचारबंदी व लॉक डाऊनच्या काळात मुख्यधिकारी राहुल पाटील व पोलीस निरीक्षक जामनेर प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक पहुर राहुल खताळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केलेल्या नियोजनामुळे रूग्णसंख्या घटली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.आर.के.पाटील व वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.जितेंद्र वानखेडे यांनी व जामनेर-पहुरच्या सर्व स्टाफ नर्स,आरोग्य सेविका,वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी यांनी एकत्रित मिळून अत्यवस्थ रुग्णांवर योग्य उपचार व सेवा करून मृत्यू दर कमी ठेवला.