जामनेर टेक्सटाईल भूसंपादनास सुरुवात

0

जामनेर : जामनेर औद्योगिक क्षेत्रात उभारण्यात येणार असलेल्या टेक्सटाईलसाठीच्या लागणार्‍या जागांसाठी भूसंपादन प्रक्रियेस आज जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी मान्यता दिली. यात जामनेर औद्योगिक क्षेत्रातसाठी कसबे-जामनेर (306.50 हे. आर), मौजे-आंबिलहोळ (93.33 हे. आर), मौजे-होळहवेली (248.79 हे. आर) व मौजे गारखेडा बुद्रुक (143.92 हे. आर) असे एकूण (792.54 हे. आर) असून रेडीरेकनरच्या पाचपटीने शेतकर्‍यांना मोबदला मिळणार आहे.