जामनेर एमआयडीसीची ना. महाजनची पाहणी

0

जळगाव – जामनेर येथिल नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीची आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्रविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांनी पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जामनेर येथे औद्योगिक वसाहतीसाठी कसबे जामनेर येथील 306.50 हेक्टर, अंबिल्होळ 93.33, होळ हवेली 248.79 , गारखेडा बु. 143.92 हेक्टर जमिनीवर असे एकूण 792.54 हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नोटीसा जारी केल्या आहेत. या जमिन संपादनासाठी जळगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार उपअधिक्षक भुमि अभिलेख यांचे मार्फत जमिनीची मोजणी प्रक्रिया 17 तारखेपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभुमिवर ना. गिरीष महाजन यांनी आज या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी जलज शर्मा, तहसिलदार, भुमि अभिलेख अधिकारी आदी उपस्थित होते. जमिन संपादनाची प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्या.