जामनेर अतिक्रमणाच्या विषयावर मंत्री गिरीश महाजन यांची तटस्थ भूमिका

0

जामनेर । शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी नित्यांचीच गर्दी असते. शहरातील अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. संपुर्ण शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. अतिक्रमणाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नगर पालिका प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमणाच्या प्रश्‍नावर नगरपालिका आणि हॉकर्स यात वाद सुरु आहे. यातुन मार्ग काढण्यासाठी उपाय काढण्याची गरज आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे याच शहरातील रहिवासी असल्याने हॉकर्संकडून या प्रश्‍नी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. धंदेवाईकांनी मंत्री महाजनांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. महाजनांनी धंदेवाईकांशी चर्चा केली असता अतिक्रमाच्या विषयावर महाजनाची भुमिका तटस्थ असून अतिक्रमण हटविणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे अल्याचे त्यांनी सांगितले. त्याच हा दृष्टीने धंदेवाईकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍न असल्याने धंदेवाईकांना अन्याय होणार नाही असे उपाय सुचविण्यात येईल तसेच लवकरच याप्रश्‍नी तोडगा काढला जाईल व पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल अशी ग्वाही दिली.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न
शहर मोठे असल्याने या ठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. अतिक्रमणाच्या मुद्दावरुन धंदेवाईक व नगरपालिका प्रशासनात वाद सुरु आहे. यावर लवकर तोडगा न निघाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. नगरपालिकेतर्फे वारंवार कारवाई करण्यात येत आहे मात्र धंदेवाईक याला जुमानत नसुन पुन्हा अतिक्रमण करीत आहे. तसेच होळीचा सण असल्याने मोठ्या प्रमाणात उलाढाला होणारी असते. त्यामुळे अतिक्रण धारक कारवाईला जुमानत नाही. अतिक्रमणा धारकांना पर्यायी जागा उपलब्ध करुन दिल्या शिवाय शहर अतिक्रमण मुक्त होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

न्याय मिळवून देण्याची मागणी
शहरातील अनेकांचा गुजराण धंद्यावर अवलंबुन आहे. जामनेर शहराला लागुन अनेक खेडे गाव असल्याने आणि शहर हे तालुक्याचे शहर असल्याने या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. अनेकांचे परिवार यांच्यावर अवलंबुन आहे. शहरातील पाचोरा रोड, जळगाव रोड, भुसावळ रोड, वाकीरोडवरील रस्त्याच्या दोन्ही बाजुकडील अतिक्रमण काढण्यात आले असून नगर परिषद व पोलिस प्रशासनाकडून कारवाईत सुरु आहे. गावातील वाहतुक सुरळीत रहावी पोलीस प्रशासनातर्फे कारवाई केली जात आहे. मात्र कारवाई करतांना धंदेवाईकांचा विचार करावा अशी मागणी होत आहे. नगराध्यक्ष, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून न्यायाची मागणी होत आहे.

कारवाई सुरु
तालुका असल्याने या ठिकाणी येणार्‍या जाणार्‍यांची संख्या मोठी असते. तसेच हे शहर बाजाराचे ठिकाण असल्याने बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात रहदारीचा प्रश्‍न निर्माण होतो. अतिक्रमणामुळे शहरातील वाहतुकीचे प्रश्‍न निर्माण झाले आहे. अतिक्रमणाचा प्रश्‍न हा शहर वाशियांचा जिव्हाळ्याच्या प्रश्‍न बनल्याने अतिक्रमण हटविणे त्यादृष्टीने महत्त्वाचे बनले आहे. अतिक्रमण हटविण्याची वारंवार मागणी होत असल्याने नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेण्यात आली आहे. नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण धारकांवर कारवाई सुरु आहे.