जामनेरात नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यापार्‍यांची दुकाने सील

शासकीय कामात अडथळा आणल्याने एकावर गुन्हा

जामनेर (प्रतिनिधी) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना या विषाणुचे संसर्ग बाधीत रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर मिनी लॉकडाऊन लागू करण्यातआला आहे. जामनेर नगरपरीषद क्षेत्रात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यापार्‍यांची दुकाने आज मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परीषदेच्या कोरोना प्रतिबंधक पथकाने सील केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रुपेरी जनरल अँड बॅग हाऊस, न्यू दीपा जनरल, गांधी मार्केट, मेमसाब गिफ्ट शॉपी, स्वाती जनरल (गांधी मार्केट), प्रीती जनरल ( गांधी मार्केट), पाटील इलेक्ट्रॉनिक्स (नवकार प्लाझा वाकी रोड), मॅजिक मोबाईल जुना बोदवड रोड, ताज पान सेंटर (जुना बोदवड रोड), योगेश सीट कव्हर अँड हूडमेकर ( नवकार प्लाझा), आर कुमार टेलर्स (राजमोती मार्केट), शिंदे सलून (राजमोती मार्केट) ही १२ दुकाने सील करण्यात आली.
हॉकर्सविरूध्द गुन्हा
सै. अक्तर सै महेमुद, राजु ठगसिंग हंसकर,दुर्गेश राजेंद्र सोनवणे,करण ज्ञानेश्वर कालेकर असे पथकासोबत जामनेर पोलीस स्टेशनचे पोहेको गोपाल जधव,पोना शिवाजी पाटील यांनी आठवडे बाजारातही पाहणी केली. यावेळी भाजीपाला विक्रेता संतोष रघुनाथ सोनवणे (रा.शास्वी नगर जामनेर) हा मास्क न लावता हातगाडीवर भाजीपाला विक्री करीत असतांना मिळुन आला. त्यास विचारणा केली असता त्याने पथकाशी हुज्जत घातली. दरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जामनेर पोलिसात नपा लिपिक गजानन माळी यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. पथकासह यावेळी मुख्याधिकारी राहुल पाटील, दुर्गेश सोनवणे, प्रदीप धनके, रविकांत डांगे, आशिष सहाणे, भूषण वर्मा, राहुल पाटील, नरेंद्र पाटील, गजानन माळी, दत्तू जोहरे,
गजानन गाडगे, सय्यद अख्तर, शेख बिलाल व इतर नगरपालिका कर्मचारी यांचा कार्यवाहीत सहभाग होता.