जामनेरात गृहमंत्री देशमुखांच्या पुतळ्याचे दहन

भाजपातर्फे राजीनाम्याच्या मागणीसाठी निवेदन

जामनेर (प्रतिनिधी ) माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राव्दारे माहिती देऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचे टारगेट दिले होते हे सांगून मोठा गौप्यस्फोट केला. यानंतर भाजपा गृहमंत्र्यांविरोधात प्रचंड आक्रमक झाली आहे. जामनेरात भाजपाच्यावतीने तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी तहसीलदार अरुण शेवाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, गोविंद अग्रवाल, नगरसेवक अतिश झाल्टे, गटनेते प्रशांत भोंडे, नाना बाविस्कर, जितेंद्र रमेश पाटील, आनंदा लव्हरे, सरपंच तुकाराम निकम, जावेद रशीद मुल्लाजी, सुभाष पाटील, रवींद्र पाटील, विलास पाटील, रवींद्र बंडे, श्याम गुजर, खलील खान, रवींद्र झालटे, शब्बीर महंमद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Copy