जामनेरात आयपीएलच्या सामन्याच्या सट्ट्यावर छापा

लाखोंच्या मुद्देमालासह १४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जामनेर (प्रतिनिधी)- जामनेर शहरातील श्रीराम नगर भागातील एका घरात आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द सनरायझर्स हैद्राबाद या संघांच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा बेटींग लावणार्‍यांवर स्थानिक गुन्हे शाखा व जामनेर पोलिसांनी छापा टाकुन मुद्देमालासह १४ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
शहरातील श्रीराम नगर भागातील एका घरात चैन्नई सुपर किंग्ज व सनरायजर हैद्राबाद या दोन संघा दरम्यान आयपीएलचा सामना सुरु असताना सट्टा लावण्यात येत होता. याबद्दल गुप्त माहिती मिळाताच स्थानिक गुन्हे शाखा व जामनेर पोलिस यांच्या पथकाने दिनांक २८ रोजी रात्री ८.३५ वा. छापा टाकला. या छाप्यात मुद्देमालासह १४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान याप्रकरणी गुरनं. १३९/२०२१ महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४,५१२ (अ), सह भा.दं.वि. कलम १८८ प्रमाणे. फिर्यादी सहा पोलीस निरीक्षक स्वप्नील किशोर नाईक गुन्हे शाखा जळगांव. यांच्या फिर्यादीवरून आरोपी अशोक उखडू हिवराळे (वय ६३ जामनेर), अक्षय प्रताप पाटील (वय २२), विकास सुरेश माळी (वय २६), अजय विठ्ठल माळी (वय ३२), शुभम संजय पाटील (वय २२), संदिप देविदास खडके (वय ४२), सतिष लक्ष्मण माळी (वय ४५), जहिरखान हनिफखान (वय ९), सचिन हिलाल धनगर (वय ३२ रा. शिंगाईत), भुषण सुरेश कवळकर वय २८, किरण अनिल जाधव (वय २५), धनराज प्रल्हाद साबळे (वय २४), अमन सुधाकर दळे (वय १८ रा. टाकळी), उमेश दिलीप जगताप (वय ३७ रा. जामनेर) या संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
मुद्देमाल जप्त
या कारवाईत ५,३०,७३० रु. किमतीचे टिव्ही, सेटटॉप बॉक्स, रिमोट, लॅपटॉप व मोबाईल फोन, कॉम्प्युटर, मॉनिटर, चार्जर, केबल, इंटरनेट मॉडेम, इले. बोर्ड, ऍडप्टर, मोटार सायकल सह मिळुन आले त्यांच्या जवळून एकूण त्यात ६३३३० रु. रोख त्यात २७ वेगवेगळ्या कंपनीचे. मोबाईल फोन्स, लॅपटॉप, कंप्यूटर मॉनिटर, टिव्ही संच, इंटरनेट डोंगल, मॉडेम, राऊटर, कि, बोर्ड, सेटअप बॉक्स,०८ मोटार सायकली, मोबाईल चार्जर्स आदी मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. वरील १४ आरोपींवर गुरनं. १३९/२०२१ महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४,५१२ (अ), सह भा.दं.वि. कलम १८८ प्रमाणे.जामनेर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सह पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, रविंद्र गिरासे, राजेश मेंढे, संजय हिवरकर, सुनिला दामोदरे, जयंत चौधरी, राजेंद्र पवार, संतोष मायकल, जामनेर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, दिलीप वाघमोडे, विनोद पाटील, अरवींद मोरे, शाम काळे, तुषार पाटील यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका विनोद पाटील हे करीत आहे.