जामनेरच्या नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्यांचा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, भाजपात प्रवेश !

0

जामनेर: तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचे निकाल जाहीर होऊन सरपंच आरक्षण जाहीर झाले आहे. सरपंच निवडणूक १० ते १८ फेब्रुवारीपर्यंत जाहीर होणार आहे. सर्वच राजकिय पक्षांकडून सरपंचपदासाठी राजकीयची फिल्डिंग लावली जात आहे. दरम्यान कुंभारी बु येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुनील भाऊसाहेब मोरे, संदीप गीताराम मंडाळे, राजकुमार काशिनाथ भवर यांनी बुधवारी १० रोजी माजी मंत्री आमदार गिरिष महाजनांच्या निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्याउपस्थितीत प्रवेश झाला. यावेळी जे.के.चव्हाण, तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक महेंद्र बावस्कर, रवींद्र झाल्टे यांच्या प्रमुख यावेळी उपस्थित होते.

यावेळी धोंडीराम जोशी, गणेश कौतीक महापूर, डिगंबर बाबुराव जोशी, अशोक सुंदर जोशी, राजू चंद्रभान धुमाळ, संजय काकासाहेब मोरे, पवन गंगाराम पाचंगे, कानिफनाथ भाऊसाहेब मोरे, राउसाहेब नवसु मोरे, ईश्वर बाबुराव निंबाळकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे.