जामतलावच्या नशिबी तीव्र पाणी टंचाईच्या मुकाबल्याचा सामना

0

नवापूर। तालुक्यातील जामतलाव गावाला तीव्र उन्हाळ्यात पाणी टंचाईशी सामना करावा लागत आहे. सुमारे तीन चार हजार लोकवस्ती या गावाची आहे. सध्या सकाळपासून गावातील महिला, मुले पाणी मिळावे म्हणून हंडा, बादली, कळशी घेऊन नळाजवळ रांगा लावत आहेत. मात्र फक्त दहा मिनिटे पाणी येऊन बंद होते.

दरवर्षी गावात उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते. या भागातील भौगोलिक परिस्थिती ही उतार चढावाची असल्याने पाण्याची पातळी खालावते व पाणी टंचाई निर्माण होत असते. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत टॅन्कर आणून जामतलाव वाशियांना पाणी देत असते. या गावात पाणीपुरवठा करण्यासाठी पाईप लाईन टाकण्यात आली आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी पाणी टंचाई होणार नाही. तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यावर सध्या तरी पाण्याची समस्या कमी जास्त प्रमाणात आहे. काही भागात जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पाणी टंचाई जाणवत असते जामतलाव गावातील महिलंनी सांगितले की, नळातुन फक्त दहा मिनिटे पाणी येते नंतर पाणी येत नाही वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्युत मोटार बंद होऊन पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. टॅन्करने पाणी मिळते दरवर्षी हीच समस्या निर्माण होत असते. यावर कायम स्वरूपी योजना करून आमचे गाव पाणी टंचाई मुक्त करावे अशी आमची मागणी आहे.

आमच्या जामतलाव गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होत असते, जमिनीतील पाण्याची पातळी खालावते, हॅण्डपंप मधुन पाणी येणे बंद होते दरवर्षी टॅन्कर आणुन पाणी गावाला पुरवले जाते, पाणी टंचाई होऊ नये म्हणून वॉटर सप्लाय मंजुर करून पाईप लाईन टाकण्यात आली आहे तसेच विहीर सुध्दा मंजुर झाली असुन ती करण्यात येणार आहे पुढचा वर्षी पाणी टंचाई निर्माण होणार नाही ,उपाय योजना करण्यात आली आहे
सुरेश गावीत, सरपंच