जाणिवपूर्वक केलेली कारवाई, आमदारांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न – आ. गिरीश महाजन

मुंबई – भाजपाच्या 12 आमदारांना निलंबित करण्याची कारवाई अयोग्य असून, ती जाणिवपूर्वक केलेली असल्याचे आ. गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

सरकारने सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासून पहावे. कोण, काय बोलले, कोणी कोणाला आवरले ते तपासून पाहावे. आम्हाला लक्ष्य करणे निषेधार्ह आहे. विधानसभेच्या कामकाजात आजचा दिवस म्हणजे ‘काळा दिवस’ आहे. आम्हाला शिवीगाळ करणार्‍या आमदारांवरही कारवाई झाली पाहिजे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत विरोधी आमदारांचे संख्याबळ कमी होण्यासाठी ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असेही आ. गिरीश महाजन म्हणाले आहेत.